फलटण चौफेर दि २९ ऑक्टोबर २०२५
शेतकऱ्यांच्या सहकार, विश्वास आणि विकासाच्या वाटचालीचा शतकपूर्ती सोहळा — होळ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा शताब्दी महोत्सव सोहळा उद्या गुरुवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी सायं. ४ वा. साखरवाडी येथील भाजी बाजार मैदानावर भव्यदिव्य पद्धतीने पार पडणार आहे.या ऐतिहासिक सोहळ्यास विधान परिषदेचे मा. सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या शुभहस्ते सोहळ्याचा शुभारंभ होईल. सोहळ्याचे अध्यक्षस्थान फलटण तालुक्याचे माजी आमदार दीपकराव चव्हाण भूषवणार आहेत.या वेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, पंचायत समिती फलटणचे सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक-निंबाळकर, श्री दत्त इंडियाचे संचालक जितेंद्र धारू, मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक डॉ. राजेंद्र सरकाळे, सहायक निबंधक दाजी खताळ, विभागीय विकास अधिकारी अजित निंबाळकर, प्रशासकीय अधिकारी विलास धुमाळ, आणि श्री दत्त इंडियाचे प्रशासकीय अधिकारी अधिकारी अजितराव जगताप हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धैर्यशील अनपट, पंचायत समितीच्या माजी सभापती रेश्मा भोसले, कृ.उ.बा.स. फलटणचे उपसभापती भगवानराव होळकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती दिलीप अडसुळ, श्रीराम कारखान्याचे संचालिका द्रौपदा नरुटे, पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, वसंतराव गायकवाड, दूध संघ फलटणचे चेअरमन धनंजय पवार, पंचायत समितीचे माजी उपसभापती महादेव बोंद्रे, श्रीराम कारखान्याचे संचालक रमेशकाका बोंद्रे, कृ.उ.बा.स. फलटणचे संचालक संजय कदम, मालोजीराजे बँकेचे संचालक अॅड. विजय नेवसे, ज्येष्ठ नेते तानाजी बिबे, गोकुळ रुपनवर, दूध संघाचे संचालक हणमंत नेवसे,दिलुकाका भोसले तसेच होळ सोसायटीचे माजी चेअरमन निवृत्ती भोसले, सतीश भोसले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय खुंटे, रावडी खुर्द, रावडी बु., फडतरवाडी, जिंती, खामगाव, मिलकटी, अलगुडेवाडी, कांबळेश्वर, साखरवाडी तसेच परिसरातील ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.यामध्येअविनाश खलाटे, शिवाजी शिंदे, मंगल माने, अर्चना जगताप, प्रकाश गोडसे, नजमा मेटकरी, शरद रणवरे, सुनील वाले, बापुराव भोसले, विलासराव भोसले, अमोल फडतरे, रविंद्र टिळेकर, सुभाष फडतरे, मनोहर कुदळे, रामभाऊ घोडके, समीर भोसले, नितीन भोसले, लक्ष्मण निंबाळकर, दत्तोबा रणवरे, रेखा खरात, चंद्रकांत रणवरे, लता सुळ, अशोक सोनवणे, अनिल गायकवाड, शरद रणवरे, उत्तम चौधरी, रसिका घाडगे, हणमंत माने, भारती भिसे, पोर्णिमा काटे, राहुल सोनटक्के, पल्लवी भोसले, प्रकाश पुरी, विनोद चित्रे, विजय राऊत, सुरेश दादा भोसले, सतीश माने, किसन झेंडे हे मान्यवर उपस्थित राहतील.शताब्दी सोहळा हा होळ सोसायटीच्या शंभर वर्षांच्या सहकार वारशाचा सोहळा असून, संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत कार्यरत सर्व संचालक, कर्मचारी आणि सभासदांच्या योगदानाचे स्मरण या प्रसंगी करण्यात येणार आहे. संस्थेच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम, गौरव समारंभ आणि सहकार प्रवासाचे छायाचित्र प्रदर्शन हे सोहळ्याचे मुख्य आकर्षण असेल.संस्थेचे चेअरमन राजेंद्र भोसले व व्हा चेअरमन विजयाताई लक्ष्मण भोसले यांनी सांगितले की,“शेतकऱ्यांच्या हातात आर्थिक सामर्थ्य देण्याचा जो संकल्प शतकापूर्वी झाला, त्याचे फळ म्हणजे आजची ही भक्कम सहकारी संस्था. या सोहळ्याद्वारे सहकारभाव आणि विकासाची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवू.”
फलटण तालुक्यातील राजकीय, सामाजिक, सहकारी क्षेत्रातील शेकडो मान्यवरांची उपस्थिती होणार असल्याने सहकाराचा शतकपूर्ती सोहळा ऐतिहासिक ठरणार आहे.



